Eknath Shinde Vs Thackeray | मुंबईत शिंदेंकडून ठाकरेंना मोठा धक्का Special Report
विधानसभेनंतर प्रत्येक पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारी लागला आहे. अशातच मुंबईत शिंदे गटाकडून ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडींसह १८ जणांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे आगामी निवडणुकांवर याचा परिणाम कसा होऊ शकतो याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहुया
संजना घाडी... ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्याच संजना घाडी शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या आणि ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला...
पण गेली अनेक वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या घाडींनी पक्षाला असा अचानक जय महाराष्ट्र का केला? तर यामागेही एक कारण आहे....
प्रवक्तेपदाच्या निर्णयावरुन सुरु झालेलं नाराजी नाट्य सुरुवातीला डावलल्यानं मनात असलेली खदखद यातूनच घाडी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी रविवारी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत मशाल बाजूला ठेऊन धनुष्यबाण हाती घेतला तेही पती संजय घाडी यांच्यासह....